आजीचे कृती गीत
एवढी मोठी आजी ,अरे मोठी मोठी आजी।।धृ ।।
आजीनं कापले वांगे ग बाई वांगे ग
मामाच्या घरी आले टांगे ग बाई टांगे ग
एवढी मोठी आजी ।।1।।
आजीनं आणला कोंबडा ग बाई कोंबडा ग
मामा नं केला भांगडा ग बाई भांगडा ग
एवढी मोठी आजी ।।2।।
आजीनं केल्या चकल्या ग बाई चकल्या ग
मामा आमचा नकल्या ग बाई नकल्या ग
एवढी मोठी आजी ।।3।।
आजीनं केले लाडू ग बाई लाडू ग
मामाला पोटभर वाढू ग बाई वाढू ग
एवढी मोठी आजी ,अरं मोठी मोठी आजी ।।4।।
Comments
Post a Comment